♦️लातूरच्या विविध विकास कामांसंदर्भात लेखी निवेदन देऊन केली सखोल चर्चा

१.लातूर तालुक्यातील रा.म.मा ६३ नवीन रेल्वे स्टेशन – नांदगावमोड बोरवटी-कासारगांव-हनमंतवाडी-मळवटी-कासारखेडा ते चिखलठाणा-भातांगळी-भडी पर्यंत (भाग नवीन रेल्वे स्टेशन कडे जाणारा रस्ता सहपदरीकरण रस्त्याची पूल मोहऱ्यासह सुधारणा करणे.
२. नांदगाव ते साई गावापर्यंत जाणार रस्ता
३. लातूर तालुक्यातील वांजरखेडा-अंबा-येळी-मांजरी-सामनगाव-आखरवाई-हरंगुळ ते रा.म.मा ६३ पर्यंत रस्ता भाग विमानतळ ते हरंगुळ ते महिला तंत्रनिकेतन पर्यंत रस्त्याची पूल मोहऱ्यासह दुरुस्ती करणे.
▪️ लातूर येथे नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत व नियोजन भवन इमारतीचे बांधकाम करणे प्रस्तावास मंजुरी सह निधी मंजूर करून देण्यात यावा.
▪️ राज्य व केंद्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर शहरातील लोकनेते स्व.विलासराव देशमुख पर्यायी मार्ग (फेज २) छत्रपती शिवाजी महाराज चौक ते निक्की बार जुनी रेल्वे लाइन हा पर्यायी रस्ता विकसित करणे. (तसेच या रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बस डेपो पर्यंत , दयानंद महाविद्यालय चौरस्ता, 5 नंबर चौक चौरस्ता या सर्व ठिकाणी भुयारी मार्ग करणे जेणेकरून वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये.
▪️मुख्यमंत्री ग्राम सडक रस्ते संशोधन विकास कार्यक्रम अंतर्गत लातूर शहर मतदारसंघातील विविध रस्त्यांच्या कामास निधीसह मंजुरी देण्यात यावी.
MSH – ०६ खोपेगाव, ०६ नवीन चांडेश्वर, MDR
०५ खरवटी रापवाडी नागझरी, SH – १४५ हरंगुळ खु. जेवळी – बोडका – टाकळगाव – बोरगाव तांडा, SH १४५ लातूर- बोरवटी – महापूर, SH २३२ बोरवटी – कासारगाव, MDR – ५८ गंगापूर आलमला तांडा, MSH – ०५ बसवंतपूर, MSH ०६ सिकंदरपूर, ०६ कातपूर – जगनाथपूर – हिप्परसोगा बाभळगाव – शिरसी.
सदर रस्ते कामांसाठी निधीसह मंजूरी देण्यात यावी.
▪️लातूरच्या प्रलंबित जिल्हा रुग्णालयाचा निधी त्वरित वर्ग व्हावा यासाठी अग्रही मागणी केली.
लातूर जिल्हा रुग्णालयास या वार्षिक अर्थसंकल्पात मंजूरी देण्यात आली होती मात्र अद्यापही कृषी विद्यापीठास निधी वर्ग झाला नसल्या कारणाने प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली नव्हती. याच अनुषंगाने आरोग्यमंत्री तसेच पालकमंत्री महोदयांशी चर्चा केली यावेळी त्यांनी तत्काळ कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली व राज्याच्या संबंधीत विभागास निधी वर्ग करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याच्या सुचना केल्या तसेच येत्या काही दिवसात आरोग्यमंत्री महोदय हे लातूर दौऱ्यावर येणार असून या कामाची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे आश्वासित केले.
▪️ नागरिकांना अधिकाअधिक उत्तम व दर्जेदार सेवा सामान्य उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून आयुष मंत्रालयाने जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हास्तरावर आयुष रुग्णालय बांधण्याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे त्यानुसार राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत लातूर जिल्हा मुख्यालयी 30 खटांचे आयुष्य रुग्णालय मंजूर करणेबाबत लेखी निवेदनाद्वारे मागणी केली.
▪️लातूर विमानतळ विस्तारीकरणासाठी संपादित जमिनी संदर्भात मुख्यमंत्री तसेच उद्योगमंत्री महोदयांकडे पालकमंत्री या नात्याने आपल्या माध्यमातून अंतिम मोबदला वाटपासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासंदर्भात पाठपुरावा करावा अशी विनंती लातूर भाजपाच्या नेत्या डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी मुंबई येथे भेट देऊन केली.
मोमीन हारून
एन टीव्ही न्युज मराठी लातूर
9850347529