महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती जामखेड येथील कोठारी प्रतिष्ठाणच्या कार्यालयात सर्व उपस्थित मान्यवर व बौद्ध बंधुच्या उपस्थित बुद्ध वंदना करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
कोठारी हे नेहमीच समाज कार्या बरोबरच सर्व महा पुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करत असतात तसेच त्यांच सामाजिक कार्य हे उभ्या महाराष्टाला माहीत असून त्यांच्या महान कार्याने ते सर्वाच्या आदराचे प्रतिक आहेत त्यामुळे त्यांचे कौतुक होणे गरजेचे असून आज त्यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती आम्हा सर्व बौद्ध बांधवांना घेऊन साजरी केली असून त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच असल्याचे प्रतिपादन उपस्थित मान्यवराने करत संजय कोठारी
यांनी हजारो लोकांचे प्राण वाचवले असून वृक्षारोपण, देहदान, शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक गणवेश वाटप असे अनेक कार्यात ते स्वतः पुढे असतात त्यामुळे त्यांचे कौतुक करणे गरजेचे आहे असे उपस्थित मान्यवर यांनी स्पष्ट करत जयंती उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व आदर्श शिक्षक बौद्धाचार्य गोकुळ गायकवाड, बौद्धाचार्य अशोक आव्हाड, नोटरी पब्लिक ॲडवोकेट सुमतीलाल बलदोटा, महावीर सुराणा, संकेत कोठारी,नगरव्हिजनचे संपादक बौद्धाचार्य पत्रकार संजय वारभोग,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा.सुनील जावळे सर,स्नेहालयाचे समन्वयक योगेश अब्दुले,सामाजिक कार्यकर्ते संदेश घायतडक, प्रा.राहुल आहिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मिलिंद नगर येथील युवा कार्यकर्ते दिपक घायतडक, संभाजी आव्हाड,सदाफुले आदी उपस्थित होते.
नंदु परदेशी
अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी
मो नं 9765886124