♦️अहमदनगर येथील मुकुंद नगर येथे दिनांक ११/०४/२०२५ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास शारीक सलीम शेख,वय-१७ वर्ष, रा-राजनगर दर्गादायरा मुकुंदनगर ता.जि अहमदनगर. याला बेदम मारहाण करण्यात आली. शारीक सलीम शेख यांच्या फिर्यादीवरून ४ जणांवर अहिल्यानगर कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अब्दुल रहीम आबिद शेख,शेख शेरमोहम्मद अबिद दोघे रा. मुकुंदनगर ता.जि अहिल्यानगर. तसेच शहानवाज खानसर शेख,शेख जावीद निजाम दोघे रा.दर्गादायरा ता.जि. अहिल्यानगर अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. फिर्यादी शारीक सलीम शेख हा दिनांक ११/०४/२०२५ रोजी सायंकाळी ७ वाजायच्या सुमारास हैदर नगर, दर्गा दायरा मुकुंदनगर येथे फिर्यादीचा चुलत भाऊ मुजाहिद शेख यांच्या प्लॉटचे बांधकाम चालू असल्यामुळे फिर्यादी बांधकामाला पाणी मारत होते. त्यावेळी तेथे वरील प्रमाणे सर्व आरोपी हे आले व म्हणाले की तुझा भाऊ मुज्जू कोठे आहे ? तेव्हा फिर्यादी त्यांना म्हणाले की तो कोठे आहे मला माहित नाही. असे म्हणल्यावर आरोपी हे फिर्यादीस म्हणले की आम्हाला न विचारता त्याने तो प्लॉट दुसऱ्यांना का विकला. तो प्लॉट आम्हाला घ्यायचा होता. असे म्हणून त्यांनी फिर्यादीस शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तेव्हा फिर्यादींनी शिवीगाळ का करता असे म्हणण्याचा राग आल्याने आरोपी क्र.१ व २ यांनी तेथे पडलेल्या लोखंडी गजाने फिर्यादीच्या पाठीवर उजव्या हातावर व डाव्या पायावर मारायला सुरुवात केली. तसेच आरोपी क्र. ३ व ४ यांनी फिर्यादीला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. व म्हणाले की तु जर कोणाला काही सांगितले तर तुझा भाऊ मुजाहिद याला बंदुकीने गोळी मारेल व तुला जिवंत सोडणार नाही. असे म्हणून फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिली तसेच फिर्यादींनी सिविल हॉस्पिटल येथे औषधोपचार घेऊन अहिल्यानगर कॅम्प पोलीस ठाण्यात दि . १३/०४/२०२५ रोजी सदर आरोपींवर गुन्हा दाखल केलेला आहे.