येरमाळा प्रतिनीधी (सुधीर लोमटे)-
कळंब तालुक्यातील गौर येथील जि.प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी मंथन राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला .
मंथन राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत गौर येथील जि. परिषदेच्या शाळेतील १३ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले . इयत्ता दुसरीतील स्वराज सुतार जिल्ह्यात चौथा तर राज्यात नववा क्रमांक आणि वेदांत जगदाळे याने जिल्ह्यात पाचवा व राज्यात दहावा क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांचा सत्कार गौर ग्रामपंचायत च्या उपसरपंच सौ. रामेश्वरी लंगडे यांच्या वतीने करण्यात आला . त्याचबरोबर इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत च्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .

गौर येथील जि.प. शाळेतील गुणवत्ता वाढवल्यामुळे शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षीकांचा सत्कार ग्रामपंचायत कडून करण्यात आला . यावेळी मुख्याध्यापक शेखर पाटील, जावळे सर, बांगर सर, ढोले सर, रसाळ सर, नलावडे मॅडम, सपकाळे मॅडम, कुलकर्णी मॅडम यांना सन्मानित करण्यात आले . या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण विस्तार अधिकारी माळी तर प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प. नारायण बोधले महाराज, सरपंच सुषमा देशमुख, उपसरपंच रामेश्वरी लंगडे, तात्यासाहेब देशमुख, अर्जुन देशमुख, भागवत तौर, मुकुंद देशमुख, रमेश देशमुख, बिभीषण पाटील, मारुती देशमुख उपस्थित होते . सर्व गुणवंत विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शालेय शिक्षण समिती व ग्रामस्थांच्या वतीने कौतुक करण्यात येत आहे .