भूम – महाराष्ट्रात नव्हे देशभरात सर्वसामान्य माणसांना आरोग्य सेवा अल्प दरात देणारे महाराष्ट्राचे सुपुत्र धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील आदर्श व्यक्ती असणारे आरोग्य दूत डॉक्टर राहुल घुले यांनी संपूर्ण देशभरात सर्वसामान्य नागरिकांना देश पातळीवर स्वस्तामध्ये आरोग्य सेवा मेळाव्यात म्हणून एक प्रस्ताव सादर करून त्यांच्याशी आरोग्याशी निगडित विविध विषयावर चर्चा करून आरोग्य सेवा करण्याचा भाग्य आम्हास लाभो असा आशीर्वाद भारताचे महामहीम उपराष्ट्रपती आदरणीय श्री जगदीप धनकर यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करून घेतला
भारत देशातील तमाम नागरिकांची आरोग्य सेवा माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या हाताने घडावे याची संधी आम्हा युवकांना मिळावी अशी अपेक्षा आरोग्य दूत डॉक्टर राहुल घुले यांनी महामहीम उपराष्ट्रपती यांच्या स्वग्रही जाऊन त्यांचा सन्मान सत्कार करून आशीर्वाद घेतला याचं मला आनंद आहे असे सांगितले
