यावल येथील शशिकांत सखाराम चौधरी कन्या विद्यालयात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमापूजनासह विद्यार्थिनींना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली.
यावल येथील शशिकांत सखाराम चौधरी कन्या विद्यालयात स्वतंत्र भारताचे उपपंतप्रधान आणि पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी शाळेचे लिपिक शिरीष नेहेते यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपशिक्षिका सौ. भारती नेहेते यांनी विद्यार्थिनींना सरदार पटेल यांच्या कार्याची ओळख करून दिली. तसेच विद्यार्थिनींना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली.
या कार्यक्रमाला सौ. शोभा इंगळे, सौ. अर्चना वानखेडे, सौ. मोहिनी भंगाळे, किरण कोकणी तसेच शिक्षकेतर कर्मचारी अनिल चौधरी आणि सुरेश सुरवाडे उपस्थित होते.
