वाशिम : अत्यंत अटीतटीची व विविध प्रकारच्या चर्चेचा विषय ठरलेली रिसोड पंचायत समितीच्या सभापतीची निवडणूक आज 18 नोव्हेंबर रोजी पार पडली.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या केशरबाई दिनकर हाडे यांनी वाशीम जिल्हा विकास आघाडी च्या साह्याने सभापतीपद हस्तगत केले. यामुळे वाशिम जिल्हा जनविकास आघाडी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी भाजपा व अपक्ष च्या युतीने सभापती पद मिळवले.
या निवडणुकीत मात्र महा विकास आघाडी मध्ये बिघाड झाल्याचे स्पष्ट झाले आहे.सभापतीपदी करिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या केशरबाइ हाडे यांनी आपले अर्ज सादर केले होते तर काँग्रेसकडून लक्ष्मीबाई काकडे यांनी व शिवसेनेकडून सुवर्णा नरवाडे यांनी आपले अर्ज सादर केले होते. मात्र शेवटच्या क्षणी सुवर्णा नरवाडे यांनी आपले अर्ज मागे घेतले.
तर हाडे आणि काकडे यांच्या मध्ये ही थेट लढत झाली. ही निवडणूक प्रक्रिया हात उंचावून झाली असल्याने केशरबाई यांना एकूण दहा सदस्यांचा पाठिंबा मिळाला. तर काँग्रेसच्या लक्ष्मीबाई काकडे यांना आठ सदस्यांचा पाठिंबा मिळाला. अशाप्रकारे दहा विरोधात आठ मताने केशरबाई हाडे या निवडून आल्या. या निवडणूक प्रक्रियेत पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत यांनी काम पाहिले तर त्यांना नायब तहसीलदार प्रवीण लटके, श्रीकांत वडोदे,संदीप काळबांडे यांचे सहकार्य लाभले निवडणूक प्रक्रिया नंतर राष्ट्रवादी काँग्रेस व जनविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
Ntv news मराठी
राहुल जुमडे रिसोड
जिल्हा वाशिम