♦️माळीवाडा येथील एका वॉईनच्या जवळ एका बॅगच्या दुकानासमोर विक्रीसाठी बसलेल्या व्यक्तीला तीन ते चार जणांनी जबर मारहाण केली. ही घटना शनिवारी सकाळी घडली. याप्रकरणी कोतवली पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला.
♦️याबाबत शिवराज अर्जुन बनसोडे (रा. बुर्हाणनगर, ता. अहिल्यानगर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. फिर्यादी हे एका वाईन दुकाना जवळील एका बॅगच्या दुकानासमोर विक्रीसाठी बसले होते. त्यावेळी दुकानदाराने तेथून उठण्यास सांगितले. त्यास फिर्यादीने नकार दिल्याने संबंधित दुकानदार व अन्य दोन बॅग विक्रेत्यांनी फिर्यादीला लाकडी दांडक्याने मारहाण केली. यात त्याच्या पायाला, हाताला व डोक्याला जबर मार लागला, असे फिर्यादीत म्हटले आहे.