जामखेड तालुक्यातील अरणगाव येथील अरणेश्वर विद्यालयातील सन 2001 / 02 या शैक्षणीक वर्षातील इ१०वी च्या सर्व विद्यार्थानी एकत्र येत आपल्या आयुष्यातील अनुभव आठवणी आणी हशी मस्ती करत उत्साहात गेट टुगेदर कार्यक्रम साजरा करत पुन्हा एकदा असेच भेटण्याचा संकल्प करत एक दिवशीय शाळेचा आपले शिक्षक मित्र मैत्रीणी सह आनंद घेतला आहे.

जामखेड तालुक्यातील अरणगाव येथील अरणेश्वर विद्यालया तील सन 2001 / 02 या शैक्षणिक वर्षातील इ 10 वी च्या सर्व बॅचने दि 11 मे रोजी पुन्हा एकदा एकत्र येत आपल्या शिक्षक मित्र सवगंड्या सोबत आपली एक दिवशीय शाळा भरवुन जुन्या आठवणी व नवीन घटना सवयी हेवे दावे अथवा गुण अवगुणाचे धडे वाचत आपल्या एकोप्याने दिवसभराची मजा मारत आनंद व्दिगुणीत केला.
या कार्यक्रमा साठी एकुण 60 विद्यार्थी व काही शिक्षक उपस्थित होते त्या पैकी ढवळे सर यांच्यावर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.


सर्व मान्यवर शिक्षक विद्यार्थाच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली या वेळी झिंझाडे राऊत भोईटे राळेभात कारंडे गोरे इत्यादि शिक्षक उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल गोरे यांनी तर सुत्रसंचालन मनिषा मोहळकर यांनी केले यावेळी उपस्थित सर्व मान्यवरासह विद्यार्थाचे सत्कार करण्यात आले गुण संपन्न विद्यार्थाचे मेजर सचिन काळे भाऊसाहेब राऊत सह सेवानिवृत्त सैनिकाचा सपत्नीक सन्मान करण्यात आला या वेळी मान्यवर व शिक्षकासह विद्यार्थी अशोक कारंडे व सतीष पारे यांनी आपली मनोगते व्यक्त केली तर भागवत ससाणे यांनी आभार व्यक्त केले दुपारचे स्नेह भोजन झाल्या नंतर एकुण 60 विद्यार्थी एवढ्या दिवसाने एक त्रीत आले असल्याने चांगल्याच गप्पा गोष्टी रंगात येऊन दिवसभर हजा मजा हशा झाला उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी आपला परिचय देऊन गप्पागोष्टी केल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला व गेट-टुगेदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला या गोड कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनीषा खर्डे , सुनिता आबासाहेब भोरे , रवी ससाने , सचिन राऊत अनिल यादव मुनीर शेख ,रवी थोरे, रवींद्र झिंजाडे, मिलिंद काळे , सागर शेटे ,शरद गवळी , सतीश जायभाय ,महादेव ओंबासे, गहीनाथ कोथमिरे , सुधीर सोनवणे, सुलभा काळे शिवाजी निगुडे धनंजय सातव सुनील महाराज , मच्छिंद्र आंधळे यांनी मोलाचे परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला तसेच या कार्यक्रमा दरम्यान आपल्या लाडक्या शिक्षकासाठी फोटो फ्रेम व विद्यार्थासाठी ट्रॉफी भाजपा अहिल्या नगर महिला आघाडीच्या सरचिटणीस तथा याच समुहातील विद्यार्थीनी सौ मनीषा अर्जुन मोहळकर यांच्या सौजन्याने करण्यात आल्याने सर्वांनी त्यांचे आभार व्यक्त करत कौतुक केले तर सायंकाळच्या सत्रात वंदे मातरम या राष्ट्र गीताने एक दिवशीय शाळेची पुन्हा भेटण्याच्या आणा भाका घेत सुट्टी करण्यात आली

नंदु परदेशी
अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी
मो नं 9765886124

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *