♦️जगाला युद्ध नाही
बुद्ध हवा च्या जयघोष ने निनादला मालेवाडा

♦️जेतवन बुद्ध विहाराच्या वतीने बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी


चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील मालेवाडा येथील जेतवन बुद्ध विहाराच्या वतीने बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध,बोधिसत्त्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विहारापासून ते गावातील मुख्य रस्त्याने बुद्ध मूर्ती सह जयघोष करत हातात मेणबत्ती पकडून शांततामय मिरवणूक सुगतकुटी कडे मार्ग क्रमन करण्यात आले.सुगत कुटी येथे बोधिवृक्ष तथा महामानवांना अभिवादन करून बुद्धवंदना घेण्यात आली. व त्यानंतर आदरणीय भन्ते बोधीपालो यांनी मार्गदर्शन उपासक उपासिका यांना केले. या त्रिवेणी मंगलमय प्रसंगी बौद्ध जनातील उत्साह, आनंद द्विगुणित झाला होता. समता, करुणा, विज्ञानवादी दृष्टीकोनातून मंगलमय जीवनाचा मार्ग दाखवणाऱ्या आपल्या मार्गदात्याला, तथागताला मनोभावे अभिवादन करण्यास आलेल्या उपस्थित जनसमुदायचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता खिर दान ने करण्यात आली.कार्यक्रमाला समस्त बौध्दजन तथा गावकरी उपस्थित होते.