
गंगापुर प्रतिनिधी अमोल पारखे
गंगापूर तालुक्यातील रघुनाथनगर सहकारी साखर कारखाना जय हिंद शुगरने चालवयास घेतलेला आहे. परंतु चालू हंगामातील कामगारांचे गेल्या पाच महिन्यापासून मोबदला मिळाला नसल्या मुळे कारखान्यातील कामगारांचे पगार थकले आहेत. हे थकीत कामगारांचे पगार देण्यात यावे, अशी मागणी अनिल पारखे (फॅब्रिकेशन फिटर ) यांनी केली आहे. त्यांचे एकुण अठ्ठे चाळीस हजार रुपये कारखान्याकडे थकीत आहे, असे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
त्याचप्रमाणे इतर कामगारांचे जास्त रक्कम असल्याने कामगारांमधील नाराजगी व्यक्त होताना दिसत आहे, तरी यांना यांच्या कष्टाचे पगार लवकर च्या लवकर देण्यात यांवा अशी मागणी कामगारांच्या वतीने करण्यात येत आहे. जय हिंद शुगर कारखानाच्या व्यवस्थापकीय संचालकांने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी कामगारांच्या वतीने करण्यात येत आहे.