गंगापुर प्रतिनिधी अमोल पारखे
गंगापूर येथील भारतरत्न मदर तेरेसा इंग्रजी शाळेने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली. शाळेतील सर्व ९३ विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले. ठाणगे सार्थक ९६ टक्के गुण मिळवून प्रथम आला. सपकाळ संस्कार ९५.४० टक्के द्वितीय, मोटे अथर्व ९२.८० टक्के, पाचपुते विद्या ९२.८० टक्के यांनी अनुक्रम तृतीय क्रमांक पटकावला. ११ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केले. ८७ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा जास्त टक्केवारी घेऊन विशेष प्रावीण्य प्राप्त केले. २२ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले.
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शाळेचे व्यवस्थापक फादर विल्फ्रेड सल्ढाणा, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अनुजा कुलकर्णी, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गणेश झोजे, माध्यमिक विभागाचे किशोर पठाडे, प्रशांत उबाळे, अफसर शेख, मंजुषा पाटील, राणी भुसारे, अनम खान, अब्दुल बागेस आदीसह सर्व शिक्षकांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.