♦️८.५ लाखाच्या चेक बाऊन्सच्या केसेस मधून निर्दोष मुक्तता
फिर्यादी यास रक्कम देणे लागत नसल्याचे न्यायालयाने केले स्पष्ट
अहमदनगर (प्रतिनिधी)- खरेदीखत मध्ये तसेच उसनवार घेतलेल्या रक्कमेचे परतफेडीसाठी देण्यात आलेल्या ४.२५ लाख रुपयाचे प्रत्येकी दोन असे एकूण ८.५० लाख रुपयाचे धनादेश बाऊन्स झाल्याप्रकरणी सोहम कन्स्ट्रक्शन चे मालक श्री.रघुनाथ बाजीराव मोहिते यांच्यावर मे २०२३ मध्ये न्यायालयात दोन वेगवेगळे खटले दाखल करण्यात आले होते. या दोन्ही प्रकरणी सुनावणी होऊन फिर्यादी यास रक्कम देणे लागत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट करुन आरोपी मोहिते यांना दोन्ही चेक बाऊन्सच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे.
खरेदीखतचे व्यवहाराचे बाकी असलेले ४.२५ लाख रुपये तसेच आर्थिक अडचणीसाठी उसनवार घेतलेले ४.२५ लाख रुपये असे एकूण ८.५० लाख रुपयेचे परतफेडीसाठी आरोपी मोहिते यांनी फिर्यादी यांना ४.२५ – ४.२५ लाख रुपयाचे प्रत्येकी दोन चेक्स दिलेले होते. सदरचे दोन्ही चेक फिर्यादी यांनी त्यांच्या बँक खात्यात भरले असता ते वटले नाही. चेक बाऊन्स होऊन परत आल्यावर फिर्यादी यांनी आरोपीला नोटीस पाठवून चेक बाऊन्स झाल्याबाबत कळविले. आरोपीने सदरची नोटीस न स्वीकारता नोटीस घेण्यास नकार दिला.
याप्रकरणी फिर्यादी यांनी आरोपी मोहिते विरुद्ध अतिरिक मुख्य न्यायदंडाधिकारी मा.एम.पी पांडे साहेब (कोर्ट नं.10) यांच्या न्यायालयात नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट चे कलम 138 प्रमाणे दोन फौजदारी खटले दाखल केले होते. सदर दोन्ही प्रकरणाची गुणदोषावर चौकशी करून न्यायालयाने आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी हा फिर्यादी यास रक्कम देणे लागत नाही, म्हणून आरोपी मोहिते यांना निर्दोष मुक्ततेचे 21मे 2025 रोजी आदेश दिले. आरोपीच्या वतीने ॲड. हाजी रफिक बेग, ॲड. रियाज रफिक बेग ,ॲड. आयाज रफिक बेग व ॲड. फैजान मूर्तजा बेग यांनी काम पाहिले.