अहिल्यानगर :– पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात वैजुबाभुळगाव येथे कर्तबगार महिला भगिनींना अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.राधाकृष्ण महिला बचत गटाच्या अध्यक्षा मनिषा किशोर घोरपडे पाटील यांना व श्रीमती कमलबाई सुरेश आठरे या दोन कर्तबगार महिलांना गावच्या सरपंच ज्योतीताई संतोष घोरपडे व उपसरपंच मनेश बाबासाहेब घोरपडे यांच्या हस्ते सन्मान पत्र,सन्मान चिन्ह,शाल,श्रीफळ व रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला.बचत गटाच्या माध्यमातून मनिषा घोरपडे पाटील यांनी ग्रामीण भागात उत्कृष्ट काम केले असून अनेक महिलांना त्यांनी स्वतःच्या पायावर उभे केले.तसेच कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी मोठे काम केले आहे.या पुरस्कार सोहळ्यासाठी ग्रामसेवक गिरीश उगार,संतोष भाऊसाहेब घोरपडे,कमलताई गायकवाड,सिंधुताई गायकवाड,वंदना मनिष घोरपडे,पुजा घोरपडे,लताताई गुंजाळ,मनिषा राजेंद्र घोरपडे,सविता गरड,वच्छला जरे,लताबाई घोरपडे,धनंजय आठरे,सुरेश ठोंबे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिनिधी:–भिवसेन टेमकर Ntv न्यूज मराठी पाथर्डी,अहिल्यानगर.मो.नं.9373489851.