(प्रतिनिधि मंगेश उराडे नागपुर जिल्हा)

नागपूर– राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवताना त्यांच्या अडचणी तत्काळ सोडवाव्यात, असे स्पष्ट आदेश राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

नियोजन भवन, नागपूर येथे आज पार पडलेल्या जनसंवाद कार्यक्रमात बावनकुळे यांनी थेट नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि संबंधित विभाग प्रमुखांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. या कार्यक्रमात एकूण 207 नागरिकांनी आपल्या समस्या व निवेदने सादर केली.

शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये अडथळे येऊ नयेत आणि नागरिकांच्या स्थानिक स्तरावरील समस्या वेळेत मार्गी लागाव्यात, यासाठी जनसंवाद हा प्रभावी उपाय असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात विद्यार्थी, महिलांपासून वृद्ध, दिव्यांग नागरिकांपर्यंत विविध घटकांनी उपस्थित राहून आपल्या वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वरूपाच्या तक्रारी मांडल्या.

आरोग्यविषयक समस्यांवर तातडीने कार्यवाही
आज प्राप्त झालेल्या निवेदनांमध्ये आरोग्यविषयक तक्रारींची संख्या लक्षणीय होती. त्या अनुषंगाने पालकमंत्र्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना प्राधान्याने कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

प्रत्येक निवेदनावर विभागीय स्तरावर कारवाई अपेक्षित
नागरिकांनी मांडलेल्या अडचणींमध्ये योजनांच्या लाभात येणारे अडथळे, अतिक्रमण, अंगणवाडी सेविकांच्या समस्या, वीज वितरणातील त्रुटी, कृषी आणि महसूल विभागाशी संबंधित तक्रारी प्रमुख होत्या. यावर विभाग प्रमुखांनी तातडीने कारवाई करून पुढील जनसंवादात त्याचा आढावा सादर करावा, असे आदेशही श्री. बावनकुळे यांनी दिले.कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी यांच्यासह विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *