समाज संघटित राहून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी हा उपक्रम- उध्दव भाकरे

अकोला प्रतीनिधी
छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य मध्ये ज्या बारा बलुतेदार अठरापगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्य निर्मिती केली त्याच धर्तीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा घेत ग्राम गोरेगाव बु. येथे पुरातन धनेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये सामाजिक महाआरतीचे आयोजन केले होते.
यावेळी महाआरतीचा मान जी व्यक्ती गेल्या कित्येक वर्षांपासून कार्तिक महिन्यामध्ये मातंग समाजाचे आपले पारंपरिक वाद्य वाजवत ग्राम फेरी काढत असतात, अशा विष्णू दादा वानखडे यांना महाआरतीचा मान देण्यात आला. तर आता ही आरती दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी करण्यात येईल. नेहमीसाठी हा उपक्रम चालू राहील आणि या महाआरती करिता सर्व ग्राम गोरेगाव बु मधील बारा बलुतेदार अठरापगड जातीच्या समाज घटकांना महाआरती करिता मान देण्यात येईल, जेणेकरून सर्व समाज संघटित राहून आपल्या धार्मिक स्थळाच्या माध्यमातून एका ठिकाणी येऊन सामाजिक संघटनेचा संदेश देतील; अशी संकल्पना ह.भ.प. ज्ञानेश्वरी कंठस्थ उमेश महाराज भाकरे यांचा संकल्पनेतून मांडण्यात आली. यावेळी गोरेगाव बु चे पोलिस पाटील मा रमेश भाकरे, ग्राम पंचायत सदस्य उध्दव भाकरे व ग्राम गोरेगाव बु मधील समस्त युवकांनी या महाआरतीचे आयोजन केले होते.