महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय तर्फे २०२४ चा ज्ञानोबा तुकोबा पुरस्कारप्राप्त सत्कारमुर्ती ह. भ.प. रामायणाचार्य गुरुवर्य संजयजी महाराज पाचपोर यांचा बुधवार दि. २७ सप्टेंबर २०२४ रोजी अंत्री मलकापूर येथे महायुतीच्या वतीने भव्य नागरी सत्कारचे आयोजन करण्यात आले आहे.खासदार श्री अनुपभाऊ धोत्रे , आमदार श्री रणधीरभाऊ सावरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार समारंभ होणार आहे. अकोला जिल्हा भाजपा ग्रामिणचे अध्यक्ष श्री किशोर मांगटे पाटील , शिवसेना जिल्हाप्रमुख श्री श्रीरंग दादा पिंजरकर , राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे , राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संदीपदादा पाटील , अकोला जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष अमोलभाऊ साबळे शिवसेना नेते अनिल राऊत उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी , शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुती बाळापूरच्या वतीने व सत्कार समितीचे अध्यक्ष श्री रमेश ठाकरे यांनी केले आहे . सत्कार समारंभासाठी नागरीक तथा महिला भगिनांना निमंत्रण देण्यासाठी सत्कार समितीचे अध्यक्ष रमेश ठाकरे, संदीप दादा पाटील , अमोलभाऊ साबळे, अनिल राऊत , पदाधिकारी गणेशराव तायडे , उमेश आप्पा भुसारी , श्रीकांत बराटे , प्रविण देशपांडे , विपुल पाटील घोगरे , किशोर कुचके , मंगेश म्हैसने , प्रशांत मानकर , योगेश पटोकार , मंगेश भरणे , मंचितराव पोहरे , बंडु पाटील माळी , प्रशांत गायकवाड , रमेश घटे , सुनिल गायकवाड , शामराव दादा शेलार यांच्यासह पदाधिकारी बाळापूर पातुर तालुक्यात दौरा करीत आहेत.