हरिहर पेठ येथे नागरिकांच्या उपस्थित “सुशासन दिवस” साजरा
अकोला : स्थानिक हरिहर पेठ जुना शहर येथे देशाचे माजी पंतप्रधान,भारतरत्न श्रध्येय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त २५ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय सुशासन दिवस म्हणून साजरा करण्यात आला यावेळी त्यांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते पहेलवान राजूभाऊ चव्हाण,विश्व हिंदू परिषदेचे रवी देशमाने,हिंदू बारी युवा संघटनेचे गोपाल नागपुरे यांनी केले होते.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भाजपा नेते डॉ अशोक ओळंबे यांनी आपले विचार व्यक्त करत असतांना श्रध्येय अटलजींनी तत्वाशी कधीही तडजोड न करता वेळ प्रसंगी एका मतासाठी सत्तेचा त्याग केला,रामराज्याची संकल्पना मांडणारे,मूल्यधित राजकारणी,अजातशत्रू, सर्वांना प्रिय,प्रखर वक्ते ज्यांनी आपले सर्वस्व या देशाला अर्पण केले अश्या थोर नेत्याच्या जयंती ही सुशासन दिन म्हणून घोषित केल्याबद्दल देशाचे पंतप्रधान मा नरेंद्रजी मोदी यांचे नागरिकांच्या वतीने आभार मानलें,त्यांचे जीवन चरित्र आत्मसात करून कार्यकर्त्यांनी समाजातील शेवटच्या घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याचे आव्हान डॉ अशोक ओळंबे यांनी केले.यावेळी हिंदू बारी युवा संघटना चे राष्ट्रीय पदाधिकारी श्री गोपाल नागपुरे यांनी श्रध्येय अटलजी यांच्या कविताचें महत्व सांगून त्यांचे अंगी असलेली देशभक्ती विषद करून अटलजी सारखा नेता होणे नाही असे सांगितले.यावेळी ख्रिसमस डे निमित्त नागरिकांच्या वतीने तुलसी पूजन करून भारतीय संस्कृती जतन करण्याचा संकल्प करण्यात आला,यावेळी अड राजनारायन मिश्रा,श्याम बुंदले,राजेश मिश्रा,गणेश श्रीनाथ,शुक्ला जी,यांचेसह कार्यक्रमाला परिसरातील महिला पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते.