- अकोटमध्ये गोवंश कत्तलीवर पोलिसांची कारवाई
- ६० किलो गोवंश मांस जप्त
- दोन जिवंत बैल पोलिसांच्या ताब्यात
- कत्तलीचे साहित्यही पोलिसांनी केले जप्त
- सुमारे ९२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल
- कुरेशीपुरा परिसरात पोलिसांची कारवाई
AKOLA |अकोट शहरातील कुरेशीपुरा परिसरात गोवंशाची कत्तल करून विक्री होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ६० किलो गोवंश मांस, दोन जिवंत बैल आणि कत्तलीसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा सुमारे ९२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
२० ऑगस्ट २०२६ रोजी अकोट उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे शौकतअली चौकासमोरील कुरेशीपुरा येथील एका घराची पंचांसमक्ष पाहणी केली.
यावेळी अब्दुल नईम अब्दुल रहीम, वय ४२, रा. कुरेशीपुरा, हा गोवंश मांसासह आढळून आला. घराजवळ दोन जिवंत बैल बांधलेल्या अवस्थेतही आढळले.
पोलिसांनी अंदाजे ६० किलो गोवंश मांस, दोन जिवंत बैल, दोन लोखंडी सुरे, लाकडी दांडा असलेली कुऱ्हाड आणि लाकडी ठोकळा असा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट यांच्या आदेशानुसार पोउपनि. शामकुमार बुंदेले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
एनटीव्ही न्यूज मराठी | अकोट
