AKOLA | बाळापूर येथील भिकुंड नदीचा पाञामध्ये पाच वाजेचा दरम्यान अनोळखी इसमाचे प्रेत आढळ्याने एकच खळबळ उडाली. आज सायंकाळी पाच वाजेचा सुमारास नदीपात्रात हा मृतदेह तरंगताना आढळून आला आहे.. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी बाळापुर पोलिसांना माहिती दिली.

त्यानंतर पोलीस पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल जुमळे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संभाजी हिवराळे पोलीस हेड काँन्टेबल रफीक शेख सलीम पठाण प्रफुल,वानखडे अनंता सुरवाडे घटनास्थळी दाखल झाले असून आपत्कालीन पथकाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला.. दरम्यान सदर व्यक्तीचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मृतदेहाची ओळख अद्यापपर्यंत समोर आली नाही.
अमोल जामोदे
बाळापूर, अकोला
मो. 9921012125