गंगापूर प्रतिनिधी अमोल पारखे

गंगापूर-वैजापूर रोडवर शहराजवळील जाखमाथ वाडी जवळ शुक्रवारी (दि.६ ) सायंकाळी साडेपाच च्या सुमारास दुचाकीचा व कार चा जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, निजाम बाबू शेख (वय ५५) आणि दीपक स्वरूपचंद दारूटे, (वय ४०) दोघेही मुद्देश वाडगाव येथील रहिवासी असून, दुचाकी (क्रमांक एन एच २० सीएफ ६५९४) वरून गंगापूरहून आपल्या गावी परतत असताना ही दुर्घटना घडली. जाखमाथा गावाजवळील विठ्ठल आश्रमानजीक समोरून भरधाव वेगात येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत निजाम शेख यांचा जागीच मृत्यू झाला तर दीपक दारूटे हे गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर दीपक दारूटे यांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे संदरील कार चालकांवर गुन्हा दाखल केला असुन गंगापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांच्या मार्गदर्शना खाली महीला पोलीस हवालदार कांचन शेळके ह्या करत आहेत.

निजाम शेख यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *