गंगापुर प्रतिनिधी अमोल पारखे

गंगापुर तालुक्यातील बँक व्यवस्थापकांना सूचना करण्यात आल्या असुन शेतकऱ्यांना दिलासा देणारी महत्वपूर्ण भूमिका आमदार प्रशांत बंब यांनी बजावली असून, त्यांनी बँक व्यवस्थापकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, सौरऊर्जा प्रकल्प किंवा पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करताना सिव्हील (CIBIL) अहवालाचा अडथळा करू नये असे मत व्यक्त केले आहे

गंगापुर पंचायत समीतीमध्ये २ जुन रोजी दुपारी ४ वाजता झालेल्या बॅंक व्यवस्थापक समितीच्या बैठकीत बोलताना आमदार बंब म्हणाले, “अनेक शेतकरी थोड्या फार थकीत कर्जामुळे सिव्हीलमध्ये खराब नोंदींमध्ये अडकले आहेत. त्यामुळे त्यांना सौरऊर्जा प्रकल्पासाठी किंवा पीक कर्जासाठी बँकांमध्ये अडथळे येत आहेत. हे योग्य नाही.”

“सरकारकडून सौरऊर्जेसाठी अनुदान उपलब्ध आहे. मात्र बँका सिव्हील पाहून कर्ज नाकारत आहेत, यामुळे शेतकरी निराश होत आहेत. बँकांनी सिव्हील न पाहता शेतकऱ्यांची खरी गरज ओळखून त्यांना तत्काळ कर्ज उपलब्ध करून द्यावं,” असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे

या बैठकीत तहसिलदार नवनाथ वगवाड,गटविकास अधीकारी सुहास वाकचौरे,एस. बि आय, आयडीबीआय,महाराष्ट्र ग्रामीण बॅंक, आयसीआयसी,बॅंक, जिल्हा मध्यवर्ती बॅंक,महाराष्ट्र बॅंक व अनेक बँकेचे प्रतिनिधी, बँक शाखा व्यवस्थापक व शेतकरी उपस्थित होते.यावेळी

शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे की, “सौर पॅनल लावण्यासाठी अनुदान मिळतंय, पण बँकेकडून कर्ज मिळत नाही, त्यामुळे आम्ही योजनांपासून वंचित राहतो. आमदारांनी हे लक्षात घेतल्याबद्दल त्यांचे आभार मनापासुन आभार मानतो असे शेतकऱ्याणी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे

बैठकीत यावर सकारात्मक चर्चा झाली असून, जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांमार्फत याबाबत पुढील सूचना बँकांना दिल्या जाणार असल्याचे कळले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *