
गंगापुर प्रतिनिधी अमोल पारखे
दि ३१ मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पंचक्रोशीतील नेवरगाव, वाहेगाव, मांजरी, वरखेड, मुद्देश वाडगाव, नरहरी रांजणगाव, अकोली वाडगाव, काटे पिंपळगाव अशा अनेक गावांमध्ये रथयात्रेचे पूजन करण्यात आले आहे.
गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. ३१ मे रोजी सकाळी ठीक ९ वाजता वाजत-गाजत भव्य रथ यात्रा दाखल झाली. यावेळी झालेल्या व्याख्यानात “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन गरीब अपेक्षित घटकांच्या कल्पनाकरिता संवदनशिल व समर्पित होते. त्यांची वीरता तसेच त्यांनी उत्तम राज्यकर्ती व संघटक म्हणून केलेले कार्य हे युवा पिढीस एक आदर्श प्रेरणादायी आहे; म्हणून सर्वांनी या रथयात्रेत सहभाग घ्यावा”, असे मत आयोजक सखल धनगर समाज तथा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा व युवा मोर्चा गंगापूर यांच्यावतीने करण्यात होते.
यावेळी जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी “मराठा साम्राज्याच्या इतिहासात अपूर्व योगदान देणाऱ्या राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ३१ मे रोजी भव्य रथ यात्रेचे आयोजन करण्यात आले असुन या यात्रेचा उद्देश त्यांच्या कार्याची आठवण करून देणे व जनसामान्यांमध्ये त्यांच्या आदर्शांचे स्मरण ठेवणे हा आहे. यावेळी या उत्सवात सहभागी होऊन त्यांच्या कार्याला अभिवादन करुया..”, असे मत मधुकर वालतुरे गुरुजी यांनी यावेळी व्यक्त केले.
श्री मधुकर वालतुरे गुरुजी यांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी एक आदर्श राजमाता या विषयावर व्याख्यान संपन्न झाले तसेच कुमारी वैष्णवी मनाळ हिने देखिल आपल्या व्याख्यानातून लोकांची मने जिंकली. ही रथयात्रा शांततेत संपन्न झाली असून यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी वाहेगाव येथील संरपच रेणुका भडके, मनिषा व्यवहारे, कुष्णाकांत व्यवहारे, अतुल रासकर, सुदाम भडके,अप्पासाहेब हिवाळे, रविद्र तगरे, दिपक तगरे, सोमनाथ तगरे, आदिनाथ तगरे, विठ्ठल मनाळ, पप्पु डवान, विजय तगरे, दिलीप तगरे, दत्तु तगरे, दादासाहेब तगरे, कल्याण तगरे, अंबादास तगरे, गणेश दिलवाले, काकाभाऊ मनाळ, दत्तु मनाळ, लक्ष्मण तगरे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.