जिओ ग्राहक धारकांची होत आहे फसवणूक ग्राहक झाले त्रस्त

छत्रपती संभाजीनगर

जिओ कंपनी कर्मच्याऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार पणा मुळे जिओ नेटवर्क सतत खेळत आहे लपंडाव त्यामुळे जिओ कंपनी वरून ग्राहकांचा विश्वास उडताना. म्हणजे हरवताना दिसून येत आहे आणि ग्रामीण भागा मधे ग्राहक आता सिम कार्ड पोर्ट करून इतर दुसऱ्या कंपनीन्ना पसंती देत जिओ कंपनी ला सोड चिट्ठी देत जिओ पासून मुक्त होत आहे जिओ कंपनी नेटवर्क च्या लपंडावा मुळे ग्राहक त्रस्त जिओ कंपनी व अधिकारी,कर्मचारी मस्त
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे जिओ नेटवर्क ला अनेक दिवसांपासून ग्रहण लागलेले आहे जिओ नेटवर्क सतत लपंडाव खेळत आहे मात्र या जिओ कंपनी चे कर्मचारी अधिकारी हे झोपा काढतात का असा प्रश्न निर्माण होत आहे या जिओ कंपनी चे कर्मचारी अधिकारी हे वारण वार सतत बेजबाबदार पणा ने वागत आहे सावळद बारा गाव हे १८ गावांचे केंद्र बिंदू म्हणजेच केंद्र आहे सावळदबारा येथे दोन कॉलेज,संस्था. जिल्हा परिषद शाळा आहे १८ गावांचे आरोग्य वर्धिनी केंद्र आहे शेतू सुविधा आहे सी. एस. सि. सेंटर आहे.. दोन.. तीन बँक आहे कृषी केंद्र. एम. एस. सी.आय. टी. आहे एम. एस. इ. बी. पवार होऊस. सब स्टेशन आहे या ठिकाणी असे अनेक महत्वाचे ऑनलाईन कामे चालतात तसेच सध्याला ११ वी चे ऑनलाईन ऍडमिशन ( प्रवेश ) सुरु आहे मात्र जिओ नेटवर्क सतत बंद असल्या मुळे अनेक महत्वाचे कामे सुविधा ठप्प आहे तसेच या परिसतील अनेक अशा समश्या. अडचणी संदर्भात किंवा महत्वाच्या घडामोडी.संदर्भात पत्रकारांना सुद्धा बातम्या लावण्यात नेटवर्क नसल्यामुळे मोठी अडचण निर्माण होत असून या मुळे जनतेचे विद्यार्थ्यांचे, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे तसेच या जिओ कंपनी वरती शासन प्रशासन यांनी लक्ष केंद्रित करून यांच्या वरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिओ नेटवर्क ग्राहक धारक यांची मागणी केली जात आहे जिओ ग्राहक यांच्या कडून जिओ कंपनी एक महिन्याचे आश्वासन देऊन रिचार्ज देतात परंतु जिओ नेटवर्क सतत बंद करून ठेवतात त्यामुळे एक महिन्याची सुविधा फक्त नावालाच आहे जिओ टॉवर नेटवर्क सरत बंद अवस्थेत असल्या मुळे जिओ ग्राहकांची ही मोठी फसवणूक अडवणूक पिळवणूक केली जात आहे कंपनी कडून देण्यात आलेल्या सुविधा आश्वासन हे फसवेगिरी चे ठरत आहे त्यामुळे शासन प्रशासन या गंभीर विषया कडे लक्ष देऊन यांचा बंदोबस्त करण्यात यावा तसेच जिओ टॉवर नेटवर्क सतत गायब असतं. जिओ कंपनी च्या नेटवर्क सर्वच ग्राहक कंटाळ लेले आहेत शासन प्रशासन यांनी या गंभीर समश्या ची दखल घेऊन लवकरात लवकर उपाय योजना करून या जिओ टॉवर नेटवर्क चा मनमानी कारभार थांबविण्यात यावा अशी मागणी सर्वत्र होत आहे.सोनू च्या गाण्या सारखा प्रकार सध्याला सावळदबारा परिसरात होत आहे. सोनू माझ्यावर भरोसा नाही काय असा प्रकार सुरु आहे एक परता सोनू वरती भरोसा केला जाऊ शकतो परंतु जिओ नेटवर्क वरती ग्राहकांचा भरोसा राहिलेला नाही कारण जिओ नेटवर्क कधी गायब होणार याचा अंदाज व विश्वास राहिलेला नाही

एन टीव्ही न्यूज मराठी न्यूज रिपोर्टर जब्बार तडवी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *