धाराशिव:

उमरगा शहरातील महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी कैलास शिंदे यांची तर व्हाईस चेअरमन म्हणून दत्तू कांबळे यांची निवड करण्यात आली.मंगळवारी संस्थेच्या कार्यालयात प्राधिकृत अधिकारी एन.पी. हाडुळे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात आली होती त्यात बिनविरोध ही निवड करण्यात आली निवडी नंतर नूतन चेअरमन व संचालकांचा सत्कार करण्यात आला.

शहरातील महात्मा फुले नागरी सहकारी पथसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यात आली यात संचालक म्हणून मत्सेंद्र सरपे, आप्पाराव गायकवाड, अभिमन्यू सूर्यवंशी, संतोष सुरवसे,रमेश जकाते,किरण सगर,अयोध्या कांबळे, हेमलता कोणाळे,यांची निवड करण्यात आली.

प्रतिनिधी सचिन बिद्री

(उमरगा, धाराशीव)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *