लवकरच मान्यवरांच्या उपस्थित अहिल्यानगर येथे होणार पुरस्कार प्रदान..

जामखेड प्रतिनिधी
दि 10 जुन

जामखेड येथील डॉ. संजय मुरलीधर भोरे यांना एन.टी.व्ही. न्युज मराठीच्या वतीने वर्धापन दिना निमीत्त देण्यात येणारा 2025 या वर्षीचा महाराष्ट्र महागौरव पुरस्कार जाहीर झाला असून तशा आशयाचे पत्र एन.टी.व्ही. न्युज मराठीचे संपादक मा. इकबाल शेख सर यांच्या वतीने त्यांना देण्यात आले असून लवकरच अहिल्यानगर येथे संपन्न होणाऱ्या एन.टी.व्ही. न्युज मराठी च्या वर्धापन दिनी त्यांना मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे.

डॉ. संजय मुरलीधर भोरे हे जामखेड तालुक्यातील देवदैठण या गावचे रहिवाशी असुन एका शेतकरी कुंटुबातील व्यक्ती आहेत. तसेच त्यांचे वडील स्वर्गीय मुरलीधर एकनाथ भोरे हे जिल्हा बँकेचे कर्मचारी म्हणून कार्यरत होते. त्यांचे संस्कार आणि शिकवण डॉ. संजय भोरे यांनी घेत वडीलांच्या सामाजिक बांधीलकीची मुठ जोपासण्याचा प्रयत्न करत आपल्या शालेय शिक्षण ते एक डॉक्टर असा खडतर प्रवास पुर्ण करत आपले स्वतःचे ‘प्रयत्न हॉस्पीटल’ हे जामखेड येथील तपनेश्वर गल्लीत उभारून चांगले नावारुपाला आणले॰ हॉस्पीटलच्या माध्यमातून त्यांनी अनेक गोरगरीब व गरजु रुणाची माफक दरात सेवा करून आपली ओळख जनसामान्यापर्यंत पोहचवली. मात्र समाजात कोणी शिक्षणापासुन वंचीत राहीले नाही पाहीजे, घरा-घरातील सर्वसामान्य कुंटुंबातील मुल-मुली शिक्षण प्रवाहात आली पाहीजेत आणि शिक्षण घेतले पाहिजे, असा ध्यास उरी बाळगत प्रतिकुल परिस्थीतीत शैक्षणीक संस्था स्थापन करत लहान मुलांच्या इंग्रजी माध्यमापासून ते 12 वी पर्यंतच्या वेगवेगळ्या गरजेच्या व ग्रामीण भागातील ठिकाणी आपल्या संस्थेच्या माध्यमातुन शाळा उभारुन मुला-मुलीच्या शिक्षणाची दारे उघडली. त्याच बरोबर समाजातील गोरगरीब रुग्णासाठी आपल्या समुहाच्या वतीने जामखेड येथे मोफत आरोग्य तपासणी व औषध गोळ्या मिळतील व त्यांचा जेमतेम पैशात ईलाज होईल, अशा सोयीचा मोफत दवाखाना सुरु करत सर्व सामान्य गोरगरीब रुग्नाची उपचार सेवा केली व आजही करत असल्याने त्यांच्या या उज्वल कार्याची दखल घेत एन.टी.व्ही. न्युज मराठी च्या वतीने त्यांना हा बहुमुल्य पुरस्कार जाहीर केला असल्याने सर्व स्थरातून त्यांचे कौतुक व अभिनंद होत आहे. पुढील काळातही ते असेच समाज सेवाभावी कार्य नक्कीच करतील अशी अपेक्षा वाटते.


येत्या काही दिवसात अहिल्यानगर येथे संपन्न होत असणाऱ्या एन.टी.व्ही. न्युज मराठी वर्धापन दिनी मान्यवरांच्या उपस्थित त्यांना हा पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात येणार आहे.

नंदु परदेशी
अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *