वाशिम:
मंगरूळपीर तालुक्यातील अंबापुर येथे एका अल्पवयीन मुलीनी दिनांक 12 रोजी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली आहे याप्रकरणी पोलिसांनी दिनांक 13 जुलै रोजी तिघा विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी पीडीत मुलींच्या वडिलांनी फिर्यादीत असे नमूद केले की,आरोपी आतिश चवरे ,अमोल टोणे व एक अज्ञात यांनी फिर्यादीच्या मुलीस ‘आमच्या सोबत बोल नाही बोलली तर तुझ्या आई-वडिलांना भावांना जीवाने मारून टाकीन’अशी धमकी देत होते याशिवाय तुमचे १० घरे आहेत असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ केली अशा त्रासापायी मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली याप्रकरणी पोलिसांनी कलम 74 ,78 108 ,35/(२)(३) बी एन एस कलम १२ पोक्सो कलम ३(१) ॲट्रॉसिटी ॲक्ट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार किशोर शेळके करीत आहे.
प्रतिनिधी फुलचंद भगत
एनटीव्ही न्यूज मराठी – वाशिम.