स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
फुलचंद भगत
वाशिम:-वाशिम पोलीस घटकामध्ये जिल्हा पोलीस अधिक्षक अनुज तारे यांनी पदभार स्विकारल्यापासुन त्यांनी कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे चालणार नाहीत, याकरीता विशेष योजना आखुन प्रतिबंधक उपाययोजना राबविल्या. आरोपीतांविरुध्द प्रभावी प्रतिबंधक कार्यवाह्या करण्यात
आल्या.
दि.१४.०७.२०२५ रोजी श्री. प्रदीप परदेशी, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांना पोलीस स्टेशन कारंजा ग्रामीण हद्दीतील ग्राम काजळेश्वर शेतशिवारामध्ये जुगार चालु असल्याबाबत मिळालेल्या गोपणीय बातमीद्वारे तात्काळ टिम रवाना करुन कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. ग्राम काजळेश्वर शेतशिवारा मध्ये आरोपी अमरदीप गजानन गावंडे + ०६ असे ५२ ताश पत्त्यावर पैशाने हारजितचा खेळ खेळत असल्याचे आढळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे जवळुन नगदी ६३,४२०/- रुपये, ०६ मोबाईल व ०५ मोटार सायकली असा एकुण १,८३,९२० /- रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कार्यवाही करीता पोलीस स्टेशन कारंजा ग्रामीण यांचे ताब्यात दिला.
सदर कारवाई अनुज तारे, पोलीस अधिक्षक वाशिम,लता फड, अपर पोलीस अधिक्षक,नवदीप अग्रवाल, सहायक पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, प्रदीप परदेशी, सपोनि. योगेश धोत्रे, अंमलदार विनोद सुर्वे, सुरज खडके, ज्ञानदेव म्हात्रे, अमोल इरतकर, गोपाल चौधरी, संतोष वाघ, सर्व स्थागुशा वाशिम यांनी मोलाची कामगीरी बजावली आहे. याबाबत वरीष्ठ पातळीवर सुध्दा दखल घेण्यात आली आहे. आली .