फुलचंद भगत
वाशिम:- दि.16 जुलै रोजी पो.स्टे.मंगरुळपीर येथील प्रांगणात श्रावण मास/कावड मिरवणूक व श्री गणेशोत्सव संबंधाने पोलिस निरिक्षक किशोर शेळके यांचे मार्गदर्शनात शांतता समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीमध्ये उत्सव संबंधाने अडीअडचणी विचारून त्यावर मार्गदर्शन करण्यात आले व योग्य त्या सूचना देण्यात आल्या बैठकीला उपस्थित लोकांनी आगामी सण उत्सव शांततेत पार पाडू असे आश्वासीत केले.

मंगरूळपीर शहरात कावड यात्रेच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत कावड यात्रा शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.कावड यात्रा शांततेत आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस विभागाकडुन करण्यात आले.

यात्रेदरम्यान, कायद्याचे पालन करणे आणि कोणताही गैरसमज किंवा वाद होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे.सोशल मीडियावर आक्षेपार्ह किंवा दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारच्या पोस्ट्स टाळण्याचे आवाहन करण्यात आले.नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि पोलिसांना मदत करावी, असे सांगीतले.कावड यात्रेदरम्यान आवश्यक सुविधा, जसे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य सुविधा आणि इतर सोयी-सुविधा पुरवण्यावर भर देण्यात येइल असे मंडळांनी सांगीतले.या बैठकीला ठाणेदार,पोलिस,कावड मंडळे यांची ऊपस्थीती होती.मंगरुळपीर शहरातील शांतता समितीची बैठक यशस्वी झाली आणि सर्वांनी कावड यात्रेसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206