(सचिन बिद्री:उमरगा)
वृक्ष लावणे नव्हे तर त्याचे संवर्धन ही खरी जबाबदारी आहे. झाडे केवळ निसर्गालाच नव्हे, तर मानवजातीच्या भविष्यासाठीही आवश्यक आहेत.केंद्र सरकारच्या अभियानाअंतर्गत आपण जो वृक्ष लावत आहोत, तो उद्याच्या पिढीसाठी छाया, अन्न, आणि प्राणवायू निर्माण करणार आहे. ही केवळ सामाजिक जबाबदारी नाही, तर आपल्या मातृभूमीबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा मार्ग आहे. एक पेड माँ के नाम म्हणजे आईच्या नावे फक्त एक झाड नाही, तर तिच्या मायेच्या आठवणींचा एक जीवंत साक्षीदार आहे,असे विक्रम डेव्हलपर्सचे कर्मचारीवर्ग प्रतिपादन करत उमरगा तालुक्यातील चिंचोली ज येथील स्मशानभूमीतील मोकळ्या जागेत जवळपास तीन हजार 3000 वृक्ष लागवड करण्यात आली.

या उपक्रमात (ज) चोंचोली सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन, ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग, बचत गट महिला, जेष्ठ नागरिक, शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक,कृषी विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी आणि विक्रम इन्फ्राटेक डेव्हलपर्स कंपनीचे सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. यासाठी (ज)चिंचोली ग्रामपंचायत तर्फे विशेष पुढाकार घेतल्याने विक्रम डेव्हलपर्स तर्फे आभार मानन्यात आले.
या मोहिमेच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचे महत्व पटवून देत देशी झाडांची लागवड करण्यात आली. यात वड, पिंपळ, आवळा, जांभूळ, करंज व बाभळी या औषधी गुणधर्म असलेल्या व पर्यावरण पूरक झाडांचा समावेश होता.
या वृक्षारोपणामुळे गावाची हरित समृद्धी निश्चितच वाढेल. गावकऱ्यांनी सातत्याने अशा उपक्रमात भाग घेणे गरजेचे असल्याचे पर्यावरण प्रेमिनी स्पष्ट केले.
