तांदुळवाडी (जि. सांगली): वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथील बांधकाम कंत्राटदार हर्षल पाटील यांनी बुधवार, दिनांक २३ जुलै २०२५ रोजी आत्महत्या केल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. या दुःखद घटनेनंतर आज आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी पाटील कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना धीर दिला.

हर्षल पाटील यांनी तांदुळवाडी परिसरात जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेचे काम घेतले होते आणि ते यशस्वीपणे पूर्ण केले होते. त्यांच्या निधनाने पाटील कुटुंबीय आणि ग्रामस्थ शोकाकुल झाले आहेत. आमदार डॉ. विनय कोरे यांनी यावेळी हर्षल पाटील यांच्या संघर्षाची, कामावरील निष्ठेची आणि प्रामाणिक प्रयत्नांची माहिती ऐकून मन सुन्न झाल्याचे सांगितले. पाटील कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत, त्यांना या कठीण प्रसंगातून सावरण्याची शक्ती मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना त्यांनी केली.

यावेळी महाराष्ट्र साखर संघाचे अध्यक्ष पी.आर. पाटील, वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक किशोर पाटील, संदीप पाटील, वारणा दूध संघाचे संचालक लालासो पाटील, बी.के. पाटील, संग्राम पाटील, शिवाजी पाटील, बाबासाहेब पाटील, उपसरपंच शशिकांत पाटील, रमेश पाटील, मयुर पाटील, बाळकृष्ण तोडकर, विनायक मोटे, प्रकाश पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

(कोल्हापूर प्रतिनिधी: किशोर जासूद)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *