लातूर: लातूर येथील सामाजिक कार्यकर्ते मोहसीन खान यांना ‘नॅशनल कॉन्फरन्स ऑफ मायनॉरिटी’ या संस्थेतर्फे ‘मौलाना अबुल कलाम आझाद समाजसेवी राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. सामाजिक चळवळीत भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो.
महाराष्ट्रासह तेलंगणा, बिहार, कर्नाटक या राज्यांतील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित केले जाते. मोहसीन खान यांनी गेल्या तीन दशकांपासून सामाजिक जीवनात सक्रिय राहून अनेक सामाजिक प्रश्नांवर अनोख्या पद्धतीने आंदोलने केली आहेत. विशेषतः मुस्लिम समाजाच्या सामाजिक प्रश्नांबाबत त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. त्यामुळेच त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
या पुरस्काराचे वितरण ९ ऑगस्ट २०२५ रोजी दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, संसद मार्ग येथे होणार आहे. या सोहळ्याला तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्यांच्यासोबतच खासदार चंद्रशेखर आझाद, खासदार वर्षाताई गायकवाड, सुजिंदर सिंग रंधावा, मौलाना मोहिबुल्लाह नदवी आणि रिचर्ड वनमहंगानीया आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मोहसीन खान यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
प्रतिनिधी अय्युब शेख
एनटीव्ही न्यूज मराठी – लातूर.