स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

फुलचंद भगत
वाशिम:-पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी वाशिम जिल्ह्याचा पदभार स्विकारल्या पासुन अनेक अपक्रम हाती घेतले. तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्या करीता जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्या करीता वेळोवेळी अवैद्य दारु, जुगार, गुटखा तसेच शस्त्र अधिनियम प्रकरणी कार्यवाही करुन गुन्हेगारांना वचक निर्माण केली आहे.

पोलीस अधीक्षक अनुज तारे यांचे आदेशानुसार पोलीस निरीक्षक प्रदिप परदेशी स्थानीक गुन्हे शाखा यांनी वाशिम जिल्हा मध्ये चालणाऱ्या अवैध दारु विक्री करणाऱ्यावर कार्यवाही करण्या करीता स्थानिक गुन्हे शाखाच्या टिमला आदेशीत करुन रवाना केले. त्या अनुशंगाने पोलीस स्टेशन अनसिंग हद्दीत ग्राम मोहगव्हाण, ग्राम कृष्णा तसेच पोलीस स्टेशन कारंजा शहर येथे दारुबंदी संबाधाने रेड केली असता तेथे सडवा मोहमाच व गावठी हातभट्टी दारु एकुन किंमत 5,19,000/- रुपयाचा माल मिळुन आला. मिळालेल्या मुद्देमाल हा पंचा समक्ष नाश केला असुन आरोपीतांन वर कलम 65 (ई) (फ) प्रमाणे गुन्हा नोद करण्यात आला आहे.सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक अनुज तारे अपर पोलीस अधीक्षक लता फड याचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदिप परदेशी सपोनी जगदिश बांगर, पोउपनी शेखर मास्कर बुध्दु रेघीवाले पो.हवा. गजानन अवगळे, सुरज खडके, आशिष बिडवे, दिपक सोनवणे, विनोद सुर्वे पो.ना. दिलीप देवकते, गजानन गोटे, पो. अंम. शुभम चौधरी, विठ्ठल महाल्ले, महीला पो. हवा सुषमा तोडकर चालक पोअंमलदार संदिप डाखोरे यांनी केली.