मुलांपेक्षा “मुलगी कुठं ही कमी नाही ” जिवंत उदाहरण. माधुरी च्या जिद्दीला आले यश
छत्रपती संभाजीनगर
सोयगाव तालुक्यातील
सावळदबारा गाव हे अतिदुर्गम भागामध्ये अजिंठा डोंगर पर्वत रांगांच्या पायथ्याशी बसलेले एक खेडे गाव आहे या ग्रामीण भागातील खेड्या
गावची मुलगी बाहेर गावी शहरामध्ये शेतकरी कुटुंब आई वडील यांच्या मदतीने शिक्षण घेऊन पहिली मुलगी वकील झाली ! — शेतकरी वडिलांच्या जिद्दीला आणि मुलीच्या चिकाटीला आले यश या शेतकरी कुटुंबाचा आनंद गगनात.
जिल्हा सत्र न्यायालय व उच्च न्यायालय औरंगाबाद येथे नुकतीच वकील म्हणून नोंदणी झालेल्या माधुरी रमेश मोरे ( देशमुख ) हिने सावळदबारा या ग्रामीण भागाचा इतिहास रचला आहे. आणि आपल्या आई वडिलांचे नाव माधुरी ने उंचावले आहे २४ मे २००० रोजी जन्मलेली माधुरी मोरे हिने जिद्द, मेहनत आणि अढळ चिकाटीच्या जोरावर एल.एल.बी.चे शिक्षण पूर्ण केले आणि ४ ऑगस्ट २०२५ रोजी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा येथे आपले नाव नोंदवले.
माधुरीचे वडील, रमेश आबाराव मोरे { देशमुख,} यांना तिन्ही मुली आहे रमेश मोरे यांनी तीनही मुलींना मुलांपेक्षा कमी न समजता शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रोत्साहन दिले. ग्रामीण परिस्थितीत अडचणी असतानाही त्यांनी कुठलाही भेदभाव न करता मुलींना पुढे नेले आणि “मुलगा श्रेष्ठ” ही चुकीची धारणा प्रत्यक्ष कृतीतून खोडून काढली. आणि मुली मुलां पेक्षा कधी ही कमी नाही हे सिद्ध करून दाखविले आणि मुलींचे शिक्षण पूर्ण केले.
सावळदबारा गावातून प्रथमच एक मुलगी वकील झाल्याने केवळ कुटुंबच नव्हे तर संपूर्ण परिसरात आनंदाचा उत्सव साजरा केला जात आहे. गावातील महिला व मुलींना प्रेरणा देणारा हा क्षण आहे. माधुरी मोरे वकील झाल्या बद्दल माधुरी चे गाव तसेच परिसरातून आणि नातेवाईक यांच्या तर्फे अभिनंदन करून शुभेच्छांचा मोठा वर्षाव होत आहे
एन. टीव्ही.न्यूज मराठी रिपोर्टर जब्बार तडवी