११ ऑगस्ट रोजी निघणार एल्गार मोर्चा
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे दिनांक ११ / ८ / २५ रोजी
ता.चाळीसगाव येथे भ्रष्टाचारमुक्त मोर्चाच्या माध्यमातून अभियान लोकशाही मार्गाने भ्रष्टाचार मुक्त अभियान घेऊन निर्णायक पावले उचलत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि ब्रिक्स ह्यूमन राइट्स मिशन यांच्या वतीने ११ ऑगस्ट २०२५ रोजी चाळीसगाव येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी यांनी चाळीसगाव येथे मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप बाबा खंडापूरकर यांच्या हस्ते महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲड. राणीताई स्वामी यांनी केले आहे या आंदोलनात चाळीसगाव तालुक्यातील गावागावांतील नागरिक, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या मोर्चामध्ये विविध सामाजिक, प्रशासकीय आणि मानवी हक्कांशी संबंधित प्रश्नांवर आवाज उठवण्यात येणार आहे. या उपक्रमाचे नेतृत्व राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर (बाबा) करत असून, त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वात महाराष्ट्रात एक नवीन जनचळवळ आकार घेत असल्याचे हि राणीताई स्वामी म्हणाल्या आहे. सर्व पदाधिकारी यांनी चाळीसगाव येथे महा मोर्चा मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ॲड. राणीताई स्वामी लातूर यांनी केले आहे.हा मोर्चा ना भूतो ना भविष्य असा हा मोर्चा महाराष्ट्राच्या सामाजिक-सामुदायिक
चळवळीच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. चाळीसगाव तालुक्यातील नागरिकांनी या मोर्चाला दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे संपूर्ण चळवळीला नवे बळ मिळाले आहे. तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी नवनाथ मांडे, तालुका अध्यक्ष (चाळीसगाव),संपूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे की, आपण सर्वांनी या ऐतिहासिक मोर्चात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून जनतेच्या संघर्षात खांद्याला खांदा लावून उभे राहावे. वैयक्तिक पातळीवर सर्वांपर्यंत संपर्क साधणे शक्य नसल्यामुळे, हीच प्रेस नोट एक अधिकृत निमंत्रणपत्रिका समजावी. आपल्या उपस्थितीची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. उल्हास पाटील महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, माजी सैनिक विभाग नवनाथ मांडे तालुका अध्यक्ष, चाळीसगाव अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती महेंद्र सूर्यवंशी तालुका अध्यक्ष, चाळीसगाव ब्रिक्स ह्यूमन राइट्स मिशन निर्मला चौधरी तालुका अध्यक्ष, चाळीसगाव मनिषा मांडे तालुका अध्यक्ष, चाळीसगाव. भिकण पाटील जळगाव जिल्हा उपाध्यक्ष उपस्थित लाभणार आहे तरी सर्व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ॲड. राणीताई स्वामी लातूर यांनी केले आहे.
प्रतिनिधी जब्बार तडवी एन टीव्ही न्यूज मराठी