CHH. SAMBHAJINAGAR | गंगापुर प्रतिनिधी अमोल पारखे वाहेगाव गावातील शेतशिवारातील तुटलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने या वाहेगाव येथील एका शेतकऱ्याचा एक बैल जागीच मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना २२ जुलै रोजी घडली आहे
सविस्तर माहिती अशी की, शेतकरी राहुल रावसाहेब सुसे हे आपला बैल घेऊन शेतात गुरे चारण्यासाठी जात असताना, शेतामध्ये पडलेल्या विद्युत तारेला बैलाचा स्पर्श झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे शेतकरी हादरून गेला असून त्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये महावितरणच्या दुर्लक्षाबद्दल संताप व्यक्त होत आहे. वारंवार तक्रार करूनही लोंबकळत्या किंवा तुटलेल्या तारांकडे व डिपी कडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामा करून शेतकऱ्याला नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे उ, बा,टा गटाचे उपतालुका प्रमुख तसेच सोसायटी चेअरमन ऋषिकेश मनाळ, अंनता भडके, राहुल सुसे, रावसाहेब सुसे, वंसत मनाळ, दादासाहेब पतंगे, यांनी महावितरण उपअभियंता गंगापूर यांना निवेदन देखील दिलेले आहे तरी प्रशासनाने तातडीने पंचनामा करून शेतकर्याला नुकसान भरपाई म्हणुण ५०००० रुपये द्यावी व विद्युत तारेची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.