बहुप्रतिक्षीत वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेचे काल (ता. १०) सायंकाळी अहिल्यानगरमध्ये मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. खासदार निलेश लंके व विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी काल (ता. १०) सायंकाळी वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, भाजपचे माजी शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्यासह भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नागपूरवरून पुण्याला येणारी ही गाडी सोमवार वगळता आठवड्यातील सहा दिवस येणार आहे. तर पुण्यावरून नागपूरकडे जाणारी ही गाडी मंगळवार वगळता आठवड्यातील सहा दिवस जाणार आहे. ही गाडी अहिल्यानगर व कोपरगावमध्ये दोन मिनिटांसाठी थांबणार आहे.