अहिल्यानगर शहरातील एमआयडीसी परिसरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. एमआयडीसीमधील एका नामांकित कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टरला खंडणी मागितल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिल्यानगर एमआयडीसी परिसरातील एका नामांकित कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टरला खंडणी मागितल्याच्या आरोपावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ९ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. याप्रकरणी स्वराज्य कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष योगेश गलांडे आणि सचिव दत्तात्रय तपकिरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी कॉन्ट्रॅक्टरने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली आणि पैसे न दिल्यास कंपनीत काम करू देणार नाही, अशी धमकी दिली. या गंभीर प्रकारानंतर फिर्यादीने तात्काळ पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. फिर्यादीने आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.