DHARASHIV | पत्रकारितेतून समता, बंधुता व सामाजिक एकतेसाठी पाच वर्षांपासून अखंड कार्य करणारे धाराशीव जिल्ह्यातील पत्रकार आयुब शेख यांना ‘महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार – २०२५’ प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र विधानपरिषद सभापती राम शिंदे यांच्या हस्ते अहमदनगर येथील हॉटेल व्ही-स्टार येथे झालेल्या ‘शाही पुरस्कार’ सोहळ्यात हा सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री पोपटराव पवार, आमदार संग्राम जगताप, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपजिल्हाधिकारी गणेश राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. एन.टी.व्ही. मराठी चे संपादक इकबाल शेख तर्फे आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी भूषवले.
