जनता विद्यालय येडशी ,या शाळेतील पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थिनींनी, सैनिकांसाठी राख्या तयार केल्या. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधून त्यांचे रक्षण करण्याची ,प्रार्थना करतात .तीच भावना आपण सैनिकांना राखी पाठवून व्यक्त करतो तसेच आपण त्यांच्यासोबत आहोत आणि त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहोत, हे दर्शवतो. सैनिकांना राखी मिळाल्यावर त्यांना आनंद होतो आणि त्यांना त्यांच्या कामासाठी प्रेरणा मिळते .या निमित्त चायना बॉर्डर वरील जवानांसाठी राख्या बनवण्याचा कार्यक्रम, विद्यालयात राबविण्यात आला. यामध्ये विद्यार्थिनींनी स्वयंप्रेरणेने मोठ्या उत्साहाने भाग घेतला. या कार्यक्रमानिमित्त विभाग प्रमुख श्रीमती देशमुख मॅडम, सर्व महिला शिक्षिका ,यांनी परिश्रम घेतले. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी विद्यालयाचे, प्राचार्य श्री नलावडे सर , उपमुख्याध्यापक श्री कांबळे सर व पर्यवेक्षिका श्रीमती नाईकनवरे मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

प्रतिनिधी रफिक पटेल
येडशी मो. 9922764189

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *