धाराशिव जिल्ह्यात भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

धाराशिव: महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचे धाराशिव जिल्ह्यात आगमन झाले. भूम-पारगाव टोलनाक्यावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

यावेळी धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय नेते आमदार श्री. राणाजगजीतसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष श्री. दत्ताभाऊ कुलकर्णी, राज्य परिषद सदस्य श्री. बाळासाहेब क्षीरसागर, माजी जिल्हाध्यक्ष श्री. नितीन काळे, राज्य कार्यकारिणी सदस्य श्री. अनिल काळे, श्री. नेताजी पाटील, श्री. सतीश दंडनाईक यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मंत्रिमहोदयांच्या स्वागतासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी आणि भाजपला अधिक मजबूत करण्यासाठी मंत्र्यांच्या या दौऱ्याकडे महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *