DHARASHIV | उमरगा तालुक्यातील सन-2024 च्या अतिवृष्टी अनुदानातुन वगळण्यात आलेल्या मुरुम महसुल मंडळास विशेष बाब म्हणून मदत करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा .सुरेश बिराजदार यांनी महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री ना .मकरंद पाटील यांना मुंबई येथे दि .६ रोजी निवेदन दिले . या निवेदनाच्या अनुषंगाने श्री पाटील यांनी धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत .
देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाच्या महसुल व वन विभागाने घेतलेल्या दि. 29 जुलै 2025 च्या निर्णयानुसार सन-2024 मध्ये उमरगा लोहारा तालुक्यातील झालेल्या अतिवृष्टी साठी रु.79880 शेतकऱ्यांना रु.86.46 कोटी अनुदान वितरीत करण्यात येणार आहे.
परंतु तालुका प्रशासनाने 33% पेक्षा अधिक पीक नुकसानीचा अहवाल सादर न केल्यामुळे मुरुम मंडळातील 10000/- (दहा हजार) शेतकरी 10 ते 12 कोटीच्या मदतीपासुन वंचीत रहात असल्याने सदरील शेतकऱ्यावर अन्याय होत आहे. आजुबाजुच्या महसुल मंडळांना मदत मिळाली असून मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मुरुम मंडळास वगळण्यात आले आहे.
तरी विशेष बाब म्हणून मुरुम महसूल मंडळाचा सन-2024 च्या शासकीय मदतीमध्ये समावेश करण्यात यावा अशी मागणी श्री बिराजदार यांनी केले होती . यावर मदत व पुनर्वसन मंत्री ना मकरंद पाटील यांनी धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत.यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस शमशोद्दीन जमादार, लोहारा तालुका अध्यक्ष सुनील साळुंखे आदींची उपस्थिती होती .

सचिन बिद्री : धाराशिव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *