हिंगोली येथे नुकत्याच झालेल्या हिंगोली जिल्हा बुद्धिबळ निवड चाचणी २०२५ मध्ये लाल बहादूर शास्त्री विद्यालय, वसमत येथील दहा बुद्धिबळपटूंनी आपली चमकदार कामगिरी सादर करत राज्यस्तरीय स्पर्धेत स्थान निश्चित केले. या यशामुळे वसमत शहराचा अभिमान दुपटीने वाढला आहे.

स्पर्धा १३ वर्षाखालील (अंडर-13), १५ वर्षाखालील (अंडर-15) आणि १९ वर्षाखालील (अंडर-19) अशा तीन गटांमध्ये पार पडली. काट्याच्या टक्कर देणाऱ्या या स्पर्धेत आपल्या कौशल्य, शांत मन आणि रणनीतीच्या जोरावर शाळेच्या खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत जिल्ह्याच्या विजेत्यांमध्ये आपले नाव कोरले.
पात्र विद्यार्थी
अंडर-13 मुली: तुलसी लड्डा, श्रेया डांगरे, ईश्वरी राऊत
अंडर-13 मुले: अवधुत गजमल, श्रेयश चव्हाण,शौर्य चेपुरवार
अंडर-15 मुली: चैतन्या गिरगावकर, वेदिका सूर्यवंशी,स्वराली सवंडकर
अंडर-15 मुले: आर्यन सवंडकर
या यशामागे शाळेचे क्रीडा शिक्षक, दोन्ही माध्यमांचे प्राचार्य आणि समन्वयक यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले. शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री. संदीप चव्हाण सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत सांगितले की, “तुमचे हे यश केवळ शाळेचेच नाही, तर वसमत व हिंगोली जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल करणारे आहे.”

गौरवाचा क्षण
ही निवड विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ता, चिकाटी आणि क्रीडावृत्तीचे प्रतीक आहे. आता राज्यस्तरीय स्पर्धेत हेच बुद्धिबळवीर आपली कला सादर करून जिल्ह्याचा मान अधिक उंचावतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.
प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत हिंगोली 98 50 56 18 50