पालघर : जव्हार नगरीतील आजी-माजी विद्यार्थ्यांचे के.व्ही.हायस्कूल मधील पी. टी.चे शिक्षक म्हणून आजही सर्वांच्या स्मरणात असलेले दुसाने सर यांच्या धर्मपत्नी सौ.मालतीताई काशिनाथ दुसाने यांचा ७५ वा अमृतमहोत्सव सोहळा व सरांनी जव्हारच्या कर्मभूमीत ५६ वर्षे पूर्ण केली. तसेच २८ नोव्हेंबर हा दुसाने सरांचा ८२ वा वाढदिवस!याचे औचित्य साधून दुसाने सरांनी लिहील्या ” परतीच्या प्रवासाची जीवन यात्रा ” या स्मरणिकेचे प्रकाशन सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी विनायक शेळके यांच्या हस्ते संपन्न झाला.
हा कार्यक्रम जव्हारच्या पेन्शनर्स भवन मध्ये,आयोजित केला होता. या प्रसंगी प्रमुख पाहूणे रमेश भदाने माजी अतिरिक्त आयुक्त व ब्रह्मकुमारी प्रजापति वाडा केंद्राच्या किरण दीदी उपस्थित होत्या.दुसाने सरांच्या मुलां-मुलींनी मातोश्री आणि पिताश्रींचा वाढदिवस अमृतमहोत्सव व स्मरणिका प्रकाशन सोहळा आयोजित केला होता. अशा नियोजन बध्द सोहळ्यात दुसाने सरांच्या अनेक आजी माजी विद्यार्थी – विद्यार्थिनींनी उपस्थिती लावली होती.त्यात गिरीश अहिरे , प्रकाश चुंबळे, काशिनाथ डोके , देवराम राऊत, यांनी तसेच प्रमुख पाहुणे विनायक शेळके, भदाने सरा ,किरण दीदी यांनी सरांच्या जीवन प्रवासाबाबत अनेक बाबीचा यावेळी उलगडा केला.
सरांची नात अमृता आणि अथर्व यांनी आजीच्या ७५व्या वाढदिवसाच्या निमित्ताने छानशी कविता सादर केली.
” परतीच्या प्रवासाची जीवन यात्रा” या स्मरणिके करीता त्याचे जावई अजयपंत रनाळकर यांनी डीटीपी, पीडीएफ, छपाई करुन स्मरणिका सुबक बनवली तर दुसरे जावई रविंद्र थोरात यांचे मोलाचे सहकार्य केले आहे. नातू अमय रनाळकर यांनी मुखपृष्ठ व मागील पृष्ठ, फोटो सेटींग केले तर मयुर थोरात यांनी स्मरणिकेचे जनरल सेटिंग्ज केले या सर्वांचे अनिल व प्रदिप दुसाने यांनी त्यांचा सत्कार केला. या प्रसंगी डॉ. शरद मुकणे यांनी नियोजन बध्द सुत्रसंचालन केले. दुसाने कुटुंबाने सरांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. दुसाने सरांच्या भाषणानंतर उपस्थितांनी वाढदिवसा निमित्ताने सौ.मालतीताई व सरांना शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ, भेटवस्तू देवून गौरव करण्यात आला.
जव्हार प्रतिनिधी
भरत गवारी,जव्हार
मोबा.नं.8408805860.