अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करुन प्रशासनाकडुन चौकशी सुरु
फुलचंद भगत
वाशिम:-नांदखेडा परिसरातुन वनविभागाच्या हद्दीतुन अवैधपणे मुरुम चोरुन नेल्याचे कळतात अधिकार्यांनी पंचनामा करत अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करत चौकशी सुरु केली आहे.अजुनही या गौणखनिज तस्कराचा पत्ता लागला नसल्याने नेमका हा मुरुम कुणी चोरुन नेला याचे नाव समोर आले नाही.

नांदखेडा परिसरातुन अवैधपणे वनविभागातुन मूरुम चोरुन नेल्याचे निदर्शनात आल्यानंतर वनविभाग अॅक्शन मोडवर आले आणी चौकशी सुरु केली.त्यातच दुसरीकडे नांदखेडा जिल्हा परिषद शाळेमध्ये क्रिडांगण योजनेतुन शुशोभिकरण सुरु असुन त्या कामात अवैधपणे आणलेला मुरुम वापरण्यात आल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर महसुल विभागानेही स्पाॅट पाहणी करत पंचनामा केला पण सबंधितांनी राॅयल्ट्या सादर केल्या.पण वनविभागातुनच अवैधपणे मूरुम आणुन त्याचा वापर शाळा परिसरातील कामासाठी केल्याचा संशय असल्याने वनविभागाने प्रकरण गंभीरतेने घेत चौकशी सुरु केली आहे.

प्राथमिक गुन्हा रिपोर्ट क्रमांक 07519/187966 दिनांक 9 ऑगस्ट 2025 मधील गुन्हा प्रकरणात मूळ दस्तऐवज सादर करणेबाबत सदर मुख्याध्यापकाला सुचित केले.प्रथम गुन्हा रीपोर्ट क्रमांक 07519/187966 दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी कारंजा वन परिक्षेत्र वनोजा मधील राखीव वनातील वन खंड क्रमांक सि- 171 मधून अवैध रीत्या खोदकाम करून मुरूम चोरून नेण्यात आलेला आहे. तरी जि प वरिष्ठ प्राथमिक शाळा नांदखेडा या परिसरामध्ये चौकशीमध्ये मुरूम आढळून आलेला आहे तो कोठून आणला आहे याची विचारणा केली आहे.जि प शाळा नांदखेडा परिसरामध्ये विविध प्रकारचे क्रीडांगण तयार करणे काम जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा नियोजन व विकास समिति वाशिम यांचा प्रशासकीय आदेश क्रमांक 675 दिनांक 27 मार्च 20205 नुसार काम मंजूर आहे. सदर काम करणारी यंत्रणा ग्रामपंचायत नांदखेडा आहे. सरपंच / ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत नांदखेडा यांच्याकडे विचारणा केली असता सदर काम ई टेंडर द्वारे शासकीय कंत्राटदार श्री माणकेश्वर रामकिसन बोरकर राहणार साई मंदिर जवळ, सारडा ट्रीमलँड सिटी, वाशिम यांना संपूर्ण कामाचा ठेका देण्यात आलेला आहे. तसेच शासकीय कंत्राटदार यांनी सदर मुरुम मंगला मनोहारलाल बरडिया गट न. 125 खानापुर खदान कारंजा येथून आणल्याचे रॉयल्टी पासेस वरुन दिसून येते. असे ग्रामपंचायत ने कळविले आहे. त्याबाबत ग्रामपंचायतणे पुरवलेले आवश्यक कागदपत्र साक्षाकीत प्रत सादर करण्यात आवेआहे. सदर कामकाजाबाबत आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती व कामांमध्ये हस्तक्षेप नाही. त्यामुळे हा मुरूम कसा कुठून व कोणत्या वाहनांमध्ये आणलेला आहे याचे मुळ दस्ताऐवस या शाळेकडे उपलब्ध नाही त्यामुळे आपणास सादर करता येणार नाही असे मुख्याध्यापकांनी सांगीतले.या खुलाश्यावरुन नेमका मुरुम कुठे गेला याचा शोध सुरु आहे.

ठेकेदाराकडुन सादर केलेल्या राॅयल्टी पास तपासणे गरजेचे
शाळा क्रिडांगणासाठी सबंधित ठेकेदाराने कारंजा तालुक्यातुन खानापुर खदानीतुन मूरुम अधिकृत राॅयल्टी काढुन आणल्याचे पुरावे सादर केले परंतु राॅयल्टीची तारिख आणी वेळ आणी आधीच त्या परिसरात मुरुम टाकल्याचे जिवो टॅग फोटोच्या पुरावे आणी तक्रारीवरुन त्या राॅयल्टी बनावट तर नाही ना? याचा शोध घेणे आवश्यक आहे.शासनाला चुना लावण्यासाठी अशा बनावट राॅयल्टीचा वापर केल्या जातो त्यामुळे या पण राॅयल्टी पासवर प्रश्नचिन्ह तक्रारकर्त्याकडुन निर्माण केल्या जात आहे.वनभिभागाने पारदर्शकपणे सखोल चौकशी करुन दोषीवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता होत आहे.संबंधित मुख्याध्यापक यांच्या खुलाशावरून सरपंच व ग्रामसेवक यांना नोटीस सोडण्यात येईल व त्यावरून मुरूम कोणी चोरून आणला हे निष्पन्न होणार असल्याचे वनभिवागाकडुन कळले.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206