लातुर : माझे संविधान माझा अभिमान या उपक्रमांतर्गत नागाबुवा विद्यालय हेळंब ता.देवणी येथे मुख्याध्यापक टि.आर.कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हेळंब येथील गावातील प्रतिष्ठीत श्री.रघुविर महाराज व ज्ञानेश्वर सावंत, तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.एस.बि.कुलकर्णी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत सर्व प्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी नागाबुवा विद्यालयात मुलींसाठी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली तसेच काही विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले व काही विद्यार्थी गित गायन केले.यावेळी श्री रघुविर महाराज यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.व इतिहास प्रमुख आर.डी.पवार यांनी माझे संविधान माझा अभिमान यावर विचार व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.बि.कुलकर्णी यांनी केले तर आभारप्रदर्शन हे संजिव जाधव यांनी केले.