हिंगोली : माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांचे प्रथम चिरंजीव युवा नेते रणजित पाटील यांच्या विवाह सोहळ्या निमित्त शुभेच्छा देण्यासाठी विधानपरिषद सदस्य मा.प्रज्ञाताई सातव ह्या माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या हिंगोली येथील निवासस्थानी आल्या होत्या त्यांनी रंणजित पाटिल यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी डॉ.प्रज्ञाताई सातव यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार करत पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनिल पाटील गोरेगावकर सुभाषराव टाले ( मामा ), पत्रकार तुकाराम झाडे, गजानन पाटील,नगरसेवक अनिल नेनवाणी, मा. नगरसेवक जहिर भाई शैलेश कान्हेड आदिनाथ कांदे अमर शुक्ला हे उपस्थित होते.