• “माझ्या मतदारसंघातील प्रत्येक नागरिक आमदार आहे” – देवरावदादा भोंगळे.


चंद्रपूर:

कोरपणा तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी कवठाळा येथे भारतीय जनता पक्षात (भाजप) जाहीर प्रवेश केला. यामध्ये शेतकरी संघटनेचे युवा नेते, उद्योजक आणि बाखर्डीचे सरपंच अरुण रागीट तसेच कवठाळा येथील सरपंच रूपाली बोबडे आणि पवनदीप यादव यांचा समावेश होता. त्यांनी कवठाळा, कोराडी, पालगाव, आणि बाखर्डी गावातील आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला.

यावेळी बोलताना आमदार देवरावदादा भोंगळे यांनी ‘सबका साथ, सबका विकास, सबका सन्मान’ या धोरणाप्रमाणे पक्षात सर्वांना सन्मानाची वागणूक मिळेल, अशी ग्वाही दिली. ते म्हणाले, “जनतेच्या कामात काही अडचण आल्यास, तुम्ही अर्ध्या रात्रीही संपर्क साधा. भाजप पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.” जनतेला दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देत ते म्हणाले, “मी आमदार झाल्यावर माझ्या मतदारसंघातील प्रत्येक माणसाला ‘मी आमदार आहे’ असे वाटले पाहिजे. हा विश्वास तुमच्या मनात निर्माण करायचा आहे.” भाजपमध्ये होत असलेले मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश पाहून ‘त्यांना’ धडकी भरली असल्याचा मिश्किल टोलाही आमदार भोंगळे यांनी लगावला.

यावेळी उपस्थित इतर मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की, भाजप हा खऱ्या अर्थाने शेतकरी, कामगार आणि सामान्य जनतेचा पक्ष आहे. विकास आणि पारदर्शक कारभार हेच पक्षाचे ध्येय आहे, तर शेतकऱ्यांचा सन्मान आणि त्यांच्या हक्काची हमी ही पक्षाची ओळख आहे. स्थानिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी भाजप हा सर्वोत्तम पर्याय आहे, असे त्यांनी सांगितले.

पक्ष प्रवेशानंतर अरुण रागीट आणि रूपाली बोबडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, त्यांनी भाजपच्या संघटनात्मक ताकदीवर, विकासात्मक दृष्टिकोनावर आणि आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या कार्यकुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला आहे. यापुढेही ग्रामविकास, शेतकरी कल्याण आणि तरुणांच्या प्रगतीसाठी ते अविरतपणे काम करत राहतील असे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाला भाजप जिल्हा महामंत्री विवेक बोढे, कोरपना तालुका अध्यक्ष संजय मुसळे, जिल्हा अध्यक्ष अरुण मडावी, राजुरा तालुका अध्यक्ष वामन तुराणकर, सतीश उपलेंचवार, पुरुषोत्तम भोंगळे, आशीष ताजने, अरुण डोहे, हितेश चव्हाण, अमोल आसेकर, ओम पवार, अशोक झाडे, निखिल भोंगळे, प्रमोद कोडापे, दिनेश खडसे, दिनेश ढेंगळे, पुरुषोत्तम आसवले, संजय नित, सचिन नांदे, मोमिन शेख आणि तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

या मोठ्या पक्ष प्रवेशामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, भारतीय जनता पार्टीची ताकद आणखी वाढल्याचे दिसून येत आहे. या वेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, शेतकरी आणि विविध सामाजिक घटकांतील नागरिक उपस्थित होते.

(मनोज गोरे, एनटीव्ही न्यूज मराठी, चंद्रपूर.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *