(सचिन बिद्री:धाराशिव)

पशुसंवर्धन आयुक्तालय औंध पुणे येथे पशुपालक शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला सुरवात झाली आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्हातून आलेल्या पशुपालक शेतकऱ्यांनी दि. १४ रोजी आंदोलनाला सुरवात केली.
राष्ट्रीय पशुधन अभियान
योजनेनुसार कित्येक महिने काम करून लागणाऱ्या कागदपत्रांची जुळाजुळव आणि त्याबरोबरच बँक प्रक्रिया पूर्ण केली. पण जेंव्हा अंतिम मंजुरीची वेळ आली,तेंव्हा केंद्र सरकारने वेळकाढूपणा
चालू केला. तसेच नवीन अर्ज स्वीकृती पण सध्या पोर्टल वरती बंद आहे.सर्वप्रथम जिल्हा स्तरावर मंजुरी मिळवली. त्यानंतर बँक प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर राज्यस्तरावरती मंजुरी मिळवली. आता फक्त शेवटची प्रोसेस बाकी होती. ती म्हणजे केंद्रस्तरावर
मंजुरी मिळणे. पण केंद्रीय स्तरावर
गेल्या सहा महिन्यांपासून मीटिंगच
झाली नसल्याने महाराष्ट्रातील
जवळपास २७८ प्रक्रलप प्रलंबित
आहेत.अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते बाबा जाफरी यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार सरकार करत असलेली फसवणूक शेतकरी मान्य करणार नाहीत.वाल्मिक शिरसाट संभाजी नगर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन
करण्यात येत आहे. जोपर्यंत यावर
केंद्र सरकार तोडगा काढणार नाही. तोपर्यंत एकही शेतकरी घरी जाणार नाही.तसेच उपोषणतील एकाही
शेतकऱ्याची आरोग्य समस्या उद्भवल्यास त्यास राज्य व केंद्र सरकार जबाबदार असेल, असा इशारा उमरगा तालुक्यातील
डाळिंब येथील पशुपालक शेतकरी
तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
तालुकाध्यक्ष बाबा जाफरी यांनी
दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *