RATNAGIRI | मंत्री उदय सामंत यांच्याकडून रत्नागिरी विमानतळाच्या कामाची पाहणीराज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी विमानतळाचा पाहणी दौरा केला. त्यावेळी त्यांनी काम सुरू असलेल्या टर्मिनल बिल्डिंगचा आढावा घेतला. त्यांच्यासोबत यावेळी प्रमुख अधिकारी, कंत्राटदार आणि आमदार किरण सामंत देखील उपस्थित होते. टर्मिनल बिल्डिंगच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या भेटीसाठी प्रयत्न सुरू असल्याचं सामंत यांनी सांगितले. मार्च 2026 अखेरीस काम पूर्णत्वाला न्या अशा सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या.